यशस्वी होण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे

२१ व्या शतकातील कौशल्ये

२१ व्या शतकातील कौशल्ये म्हणजे अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी तसेच इतर शिक्षणविषयक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ठरवलेल्या कौशल्यांची यादी आहे. २१ व्या शतकात घडणाऱ्या आणि होऊ घातलेल्या बदलांना स्वीकारून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हि कौशल्ये आत्मसात करून घेणे आवश्यक आहे असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आजची शालेय शिक्षणपद्धत किंवा त्यात अंतर्भूत असलेले विषय कालबाह्य होत आहेत का हा कदाचित वादाचा मुद्दा असेलही पण आजच्या जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये शाळेतून शिकवली जातातच असे नाही. अशा कौशल्यांच्या यादीला तज्ज्ञांनी दिलेले नाव म्हणजेच ‘21ST CENTURY SKILLS‘.

२१ व्या शतकातील कौशल्यांचे मुख्यत्वे तीन भागांमध्ये वर्गीकरण केले आहे.

भाग १ : शैक्षणिक कौशल्ये (यशस्वी होण्यासाठी)

शैक्षणिक कौशल्ये म्हणजे विद्यार्थ्यांना बौद्धिक पातळीवर कामाचे बदलते स्वरूप स्वीकारण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कौशल्ये. शैक्षणिक कौशल्यांमध्ये खालील चार उप-प्रकार आहेत.

१.१ – गांभीर्याने विचार करणे (Critical Thinking)

म्हणजे कोणत्याही गोष्टीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याचे कौशल्य असणे. थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रामाणिकपणा, वैचारिक मोकळेपणा, वैचारिक पातळीवरही सतत क्रियाशील असणे, प्रश्न विचारण्यासाठी किंवा प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी असणे, स्वतंत्र वैचारिक बैठक असणे, समस्यांचे निराकारक करण्याचे कौशल्य असणे.

१.२ – संपर्क (Communication)

आज संपर्काची माध्यमं बदलली असली तरीही प्रभाशी संपर्क करता येण्याची हातोटी असणे आवश्यक आहे. एकच संदेश वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवणे किंवा स्वतःकडील विचार, कल्पना, भावभावना इत्यादी बाबी प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवणे हि कौशल्ये प्रभावी संपर्कासाठी आवश्यक आहेत.

१.३ – सर्जनशीलता (Creativity)

नवनवीन कल्पना अस्खलितपणे सुचणे, वेगवेगळ्या बाजूंनी विचार करताना कोणत्याही विचाराशी बांधील न राहता लवचिकपणे सर्व बाजू तितक्याच प्रभावीपणे विचारात घेणे, इतरांच्या कल्पनांचा सहजपणे विस्तार करता येणे इत्यादी कौशल्ये सर्जनशीलतेची मुख्य अंग आहेत.

१.४ – सहकार्य (Collaboration)

सहकार्य म्हणजे इतरांबरोबर एक संघ म्हणून प्रभावीपणे काम करता येण्याची क्षमता असणे. संघ म्हणून काम करत असताना काही निर्णय घेणे आवश्यक असतात त्यावेळी इतरांच्या मतांचा आदर ठेऊन, संघभावनेने कार्य करता येण्याचे कौशल्य असणे.

भाग २ : साक्षरता (यशस्वी होण्यासाठी)

पारंपरिक पद्धतीने माहिती असलेली साक्षरता महत्वाची आहेच पण त्याच बरोबरीने २१ व्या शतकात साक्षरतेचे काही इतर पैलू देखील आत्मसात करणे आवश्यक आहेत. साक्षरतेचे ३ उप-प्रकारांत विभागणी केली आहे.

२.१ – माहिती साक्षरता (Information Literacy)

सक्षमपणे माहिती मिळवणे आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असणे (उदाहरणार्थ – इंटरनेटवरून एखाद्या विषयाची विस्तृत माहिती घेऊन त्या माहितीचा अभ्यास/विश्लेषण करणे), माहितीचा योग्य आणि सर्जनशील वापर करून कोणत्याही समस्येचे निराकरण करणे, अनेक ठिकाणहून येणारी माहिती हाताळणे इत्यादी.

२.२ – माध्यम साक्षरता (Media Literacy)

एखाद्या माध्यमासाठी तयार करण्यात येणाऱ्या मजकुराचा हेतू लक्षात घेणे, एखाद्या मजकुराचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्याची क्षमता असणे, कोणतेही माध्यम वापरण्याविषयी असलेल्या नैतिक तसेच कायदेशीर बाजूंची माहिती असणे इत्यादी.

यशस्वी

२.३ – तंत्रज्ञान साक्षरता (Technology Literacy)

तंत्रज्ञानाचा वापर संशोधन करण्यासाठी, दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी माहिती गोळा करण्यासाठी, तिचे विश्लेषण करण्यासाठी करता येण्याचे कौशल्य असणे.

भाग ३ : जीवन कौशल्ये (यशस्वी होण्यासाठी)

नावाप्रमाणेच जीवन कौशल्ये म्हणजे वैयक्तीक जीवनात आवश्यक असणारी कौशल्ये असणे. बहुतांशी हि कौशल्ये वैयक्तिक जीवनात जास्त उपयोगी ठरत असली तरीही त्यांचा वापर व्यावसायिक आयुष्यात देखील होतो.

३.१ – लवचिकता (Flexibility)

कामाच्या बाबतीत अथवा इतर बाबींमध्ये देखील लवचिकता असणे. सतत आपल्या सभोवताली होणाऱ्या बदलांना सामोरे जाऊन त्या बदलांचा स्वीकार करणे व त्यांच्याशी जुळवून घेणे.

३.२ – नेतृत्व (Leadsership)

काम करून इतरांना पुढे घेऊन जाण्याचे कौशल्य असणे. वेगवेगळ्या पद्धतीने संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता असणे.

३.३ – यशस्वी पुढाकार (Initiative)

कोणतेही कार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचे कौशल्य असणे. अंतःप्रेरणेतून ऊर्जा घेऊन वेगवेगळी कामं सुरु करण्याचे कौशल्य असणे.

३.४ – उत्पादकता (Productivity)

ठराविक वेळेत अधिकाधिक चांगले उत्पादक काम करता येणे तसेच वेळेचा सदुपयोग करून नवनवीन विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे कौशल्य असणे.

३.५ – सामाजिक कौशल्ये (Social Skills)

वेगवेगळ्या शहरांत, राज्यात, देशांमध्ये, संस्कृतींमध्ये सहजपणे मिसळून तिथल्या लोकांबरोबर काम करता येण्याचे कौशल्य असणे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी

सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना हि कौशल्ये आत्मसात करता येतातच असे नाही त्यामुळे इतर ठिकाणहून हि कौशल्ये आत्मसात करून स्वतःचा विकास करणे क्रमप्राप्त ठरते. जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे हि कौशल्ये जर असतील तर एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

Leave Your Comment

Your email address will not be published.*