मराठीप्लस बद्दल

आज माहितीच्या कक्षा रुंदावत आहेत, आज महाराष्ट्रातील दुर्गम खेड्यात बसलेला माणूस अमेरिकेच्या राजधानीत संपर्क करू शकतो, व्यवसाय करू शकतो, स्पेन मधील सर्वोत्तम शिक्षकाकडून स्पॅनिश भाषेचे धडे घेऊ शकतो, ऑस्ट्रेलिया मधील तज्ज्ञांशी चर्चा करू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे आणि काही किमान कौशल्य आत्मसात करून ह्या गोष्टी केल्या जाऊ शकतात.

इंटरनेट अनेक शक्यतांनी भरलेलं आहे पण बहुतांश माहिती हि इंग्रजी भाषेत किंवा इतर भाषेत आहे. रंजक माहितीचा मोठा खजिना केवळ काही भाषांपुरता मर्यादित राहू नये. अधिकाधिक भाषांमध्ये त्याचा प्रसार व्हावा, माहितीचा, ज्ञानाचा उपयोग सर्वांना व्हावा आणि अमर्यादित शक्यतांचा शोध मराठी भाषा जाणणाऱ्या प्रत्येकाला घेता यावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आपल्या वाट्याचे कर्त्यव्य म्हणून मराठी प्लसच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.

रामदास स्वामींच्या “आपणासी जे जे ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन” ह्या शिकवणीप्रमाणे जे जे शक्य होईल ते ते मराठी भाषेतून पोहोचवत राहू. लोभ असावा !