माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं ?

माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं

प्रत्येक माणसामध्ये काहीना काहीतरी खुबी असते आणि खोटं बोलणं ही सुद्धा एक खुबीच आहे. प्रत्येक माणूस दिवसातून किमान एक किंवा दोन वेळा तरी कळत-नकळतपणे खोटे बोलतोच. काही वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे आपण खोटे बोलणे ओळखू शकतो का? तर याचे उत्तर हो असे आहे. काही काळापूर्वी आपण भारतामध्ये सच का सामना नावाचा एक रियालिटी शो पाहिला होता ज्यात लाय डिटेक्टर तंत्रज्ञान वापरून समोरचा माणूस खरे बोलत आहे का खोटे याची शहानिशा केली जात होती. असे कोणतेही तंत्रज्ञान न वापरता केवळ बॉडी लँग्वेज म्हणजेच शरीराच्या हालचाली वरूनच माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं ?

बॉडी लँग्वेज अर्थात शारीरिक भाषा

संवाद साधण्याचे मुख्यत्वे दोन दोन भाग आहेत एक म्हणजे मौखिक संवाद आणि दुसरा म्हणजे शारीरिक भाषा वापरून केलेला संवाद. मूकबधिर दिव्यांग बांधव यांनी स्वतःची एक भाषा तयार केली आहे आणि ह्याच भाषेद्वारे ते सहज एकमेकांशी संवाद साधू शकतात. आपण जेव्हा एकमेकांशी संवाद साधतो तेव्हा हातवारे, डोळ्यांची हालचाल, चेहऱ्यावरचे भाव आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून एकापेक्षा अधिक संदेश समोरच्यापर्यंत पाठवत असतो. उदाहरणार्थ शाळेत मास्तरांना करंगळी दाखवणे म्हणजे लघुशंकेला जाण्यासाठी परवानगी मागणे हा त्याचा अर्थ होतो, दोन्ही हात जोडून काही न बोलता उभे राहणे म्हणजे नम्रपणे धन्यवाद करणे, स्वागत करणे अथवा क्षमा मागणे असा त्याचा अर्थ होतो. कोणताही माणूस खोटे बोलतो तेव्हा त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये वेगवेगळे फरक जाणवतात. खोटे बोलताना देखील, तुमचे नाव काय? किंवा तुम्ही कुठून आलात? एवढ्या साध्या प्रश्नांना देखील समोरचा माणूस गोंधळून जाऊ शकतो आणि नेहमी न करत असलेले हातवारे किंवा इशारे करू लागतो यातून तो बोलत असलेल्या मजकुराची शहानिशा करता येऊ शकते.

Spy the Lie: How to spot deception the CIA way

सी.आय. ए हि संस्था खोटं बोलणाऱ्यांना कशी पकडते हे सांगणारे पुस्तक

शारीरिक हालचालींवरून ओळखता येते का ?

दरवेळी हे शास्त्र योग्य निकाल देत असे नाही पण साधारण अंदाज नक्कीच बांधता येऊ शकतो. शारीरिक हालचालींचे काही ठोकताळे आहेत ज्याच्या वरून हा अंदाज बांधला जाऊ शकतो.

१. हात आणि हातवारे (माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं)

साधारणतः आपण काही बोलत असताना हातवारे करतो पण जेव्हा एखादा माणूस खोटे बोलत असतो तेव्हा हे हातवारे त्याचे बोलणे संपल्यावर होतात. तज्ञांचा यामागचा तर्क असा आहे की जेव्हा माणूस खोटे बोलत असतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये असंख्य गोष्टी तयार होत असतात, कोणत्या गोष्टीला मीठ-मसाला लावायचा असतो तर कोणती गोष्ट लपवायची असते एवढे सगळे करत असताना नैसर्गिक रित्या हातवारे करणे शक्य होत नाही त्यामुळे खोटे बोलून झाल्यावर समोरच्याने त्यावर विश्वास ठेवावा यासाठी खोटे बोलणारा माणूस बोलून झाल्यावर हातवारे करतो. तज्ञांचे अजून एक निरीक्षण असे आहे की जेव्हा माणूस खोटे बोलत असतो तेव्हा तो त्याचे तळहात तुमच्यापेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे अशा वेळी खोटे बोलणारा माणूस त्याचे हात खिशात टाकतो किंवा टेबलाखाली वैगेरे तरी लपवतो.

२. डोळे (माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं)

एखादा माणूस खोटे बोलत असतो तेव्हा एखाद्या महत्त्वाच्या क्षणी तो टक लावून पाहतो किंवा दुसरीकडे पाहतो. खोटे बोलत असताना पुढे काय खोटे बोलायचे याचा विचार करण्यासाठी सहसा डोळे इकडे तिकडे सतत फिरवत राहतो. अमेरिकेतील एका विद्यापीठाने केलेल्या प्रयोगानुसार, खोटे बोलणाऱ्या व्यक्ती खरे बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त वेळ टक लावून पाहतात.

३. तोंड

तज्ञांच्या निष्कर्षानुसार, खोटे बोलणारी व्यक्ती अनेकदा आपले ओठ अशा पद्धतीने दुमडतात की बऱ्याचदा ओठ दिसतच नाहीत. म्हणजे आपण सेल्फी काढताना जेव्हा पाऊट करतो त्याच्याबरोबर उलट करणे. अशावेळी नकळतपणे त्याच्या भावना किंवा काही माहिती लपवण्याचा प्रयत्न करत असतो. काही संवेदनशील प्रश्न विचारल्यावर शक्यतो समोरचा माणूस अशी हालचाल करतो जेव्हा त्याला अशा प्रश्नावर उत्तर द्यायचे नसते. बोलताना कधी-कधी समोरच्या व्यक्तीचे चेहऱ्यावरील हावभाव क्षणार्धात बदलतात हे देखील खोटे बोलत असल्याचे एक लक्षण आहे.

यशस्वी होण्यासाठी २१ व्या शतकातील कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे

हा लेख वाचलात का ?

४. वरच्या पट्टीतला आवाज

जेव्हा एखादा माणूस चिंताग्रस्त होतो तेव्हा त्याच्या स्वरयंत्रातील पेशी ताणल्या जातात, (अचानक तणाव आल्यामुळे शरीराकडून ही गोष्ट आपोआप घडवली जाते) यामुळे खोटे बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज वरच्या पट्टीत जातो. अशा वेळी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आवाजातील खरखर ऐकू शकता आणि समोरची व्यक्ती वारंवार आपला घसा खाकरू लागतात. खोटे बोलणारे व्यक्ती कधीतरी मोठ्या आवाजात बोलू लागते कारण स्वतःचा बचाव करण्याची प्रक्रिया त्या व्यक्तीकडून केली जात असते.

माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं

५. शब्दांचा खेळ (माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं)

काही ठराविक शब्द देखील असे आहेत जे वापरून समोरची व्यक्ती आपला खोटेपणा उघड होऊ नये यासाठी प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ ‘ माझ्यावर विश्वास ठेव’, ‘ खरंच सांगतोय’ अशा पद्धतीने तुम्हाला ती व्यक्ती तिचे म्हणणे पटवू पाहते. दर वेळेला हे शब्द वापरणारी व्यक्ती खोटे बोलत आहे असे समजण्याचे कारण नाही पण साधारणतः जे काही अंदाज आहेत त्यात खोटे बोलणारी व्यक्ती अशा शब्दांचा वापर करत असते.

६. सारवासारव (माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं)

अनेकदा खोटे बोलणारी व्यक्ती खरे बोलून जाते आणि त्यानंतर सारवासारव करू लागते. उदाहरणार्थ – ‘माझ्याकडे हजार रुपये आहेत’ असे खरे सांगितल्यावर ‘अरे नाही नाही माझ्याकडे दोनशे रुपये आहेत’ अशी सारवासारव खोटे बोलणारे व्यक्ती कडून केली जाते. बोलणाऱ्याच्या शब्दफेकी वरून बोलणारा खरे बोलत आहे की खोटी याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

माणूस खोटं बोलतोय हे कसं ओळखायचं हे सांगणारे Pamela Meyer ह्यांचे टेड टॉक

आपण आधी बघितल्याप्रमाणे हे काही ठोकताळे आहेत मात्र दरवेळी अशी लक्षणे आढळणारी व्यक्ती खोटेच बोलत आहे असे मानण्याचे कोणतेही कारण नाही. खोटे बोलणाऱ्या व्यक्तींमध्ये वर पाहिलेली लक्षण आढळून येतात त्यामुळे समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे का खरे याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपल्या आप्तेष्टांना ह्या लेखाची लिंक पाठवा.

मराठी भाषेतून अधिकाधिक लोकांपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा हा विचार घेऊन मराठी प्लस वेबसाईट सुरु करणारी असामी म्हणजे, दस्तुरखुद्द सरपंच ! तुमच्या मनातील कल्पना, सदिच्छा, तक्रारी किंवा सूचना देण्यासाठी संपर्काच्या पानावरुन तुम्ही सरपंचांशी कधीही संपर्क करू शकता.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*