माणूस हा प्रगतीशील प्राणी आहे असं आपण म्हणतो. अश्मयुगापासून सतत प्रयोग करत आजच्या प्रगतिशील समाजापर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत. मानवी विकासाचे अनेक पैलू आपल्याला बघायला मिळाले आणि आणि आजवर मानवाचा कसा टप्प्याटप्प्याने विकास होत गेला हे देखील आपल्याला माहिती आहेच. माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली असून उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांवर माणसाचा विकास होत गेला. पुरातन जगाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरून आधीचा माणूस कसा होता याचा अभ्यास करत असतात पण अश्मयुगातील सेंटिनेलीज जमात आजही अस्तित्वात आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
पार्श्वभूमी (सेंटिनेलीज जमात)
जगापासून विलग झालेली सेंटिनेलीज जमात आजही अश्मयुगीन काळातील मानवाप्रमाणे वागते. अंदमान बेटांच्या इथे उत्तर सेंटीनेल बेट आहे इथे या जमातीचे वास्तव्य आहे. ही जमात भारतीय कायद्यानुसार अनुसूचित जमात म्हणून जाहीर केली गेली आहे याशिवाय ही जमात प्रगत नसल्यामुळे भारतीय कायदे या जमातीला लागू नाहीत. सेंटिनेलीज जमातीचे लोक एक अनेक काळापासून आधुनिक मानवाच्या संपर्कात आलेले नाहीत त्यामुळे जगाची प्रगती आणि मानवाचा विकास याबाबत त्यांना कोणतीच माहिती नाही. भारतीय कायद्यानुसार या बेटाच्या साधारणपणे तीन मैलातुन प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे याचे कारण म्हणजे सेंटीनेल लोकांचे संरक्षण तसेच इतर लोकांची सुरक्षितता हे आहे.
लोकसंख्या
सेंटिनेलीज जमातीचे लोक माणसाची संपर्क करत नाही शिवाय माणसांनाही ही संपर्क करू देत नाहीत त्यामुळे या जमातीची नेमकी लोकसंख्या किती आहे हे ठाऊक नाही पण साधारण अंदाजानुसार त्यांची लोकसंख्या १५० ते ५०० असण्याची शक्यता आहे. मध्यंतरी आलेल्या सुनामी मध्ये त्यांची लोकसंख्या सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी हेलिकॉप्टरने अंदाज घेतला गेला होता तेव्हा हेलिकॉप्टरच्या दिशेने सेंटीनेलीज लोकांनी बाणांनी हल्ला केला होता त्यावरून ते सुरक्षित असल्याची खात्री पटली.
बोटीतून घेतलेले छायाचित्र हेलिकॉप्टरमधून घेतलेले छायाचित्र
विलगीकरण
जगाशी संपर्क तोडल्यामुळे अनेक रोगांची लढण्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारक शक्ती सेंटिनेलीज जमातीमध्ये विकसित झाली नाही. मध्यंतरी काही माणसांनी या जमातीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अनेक कारणांमुळे ही जमात इतर माणसांची संपर्क करण्यास इच्छुक नाही. काही माणसांनी सेंटिनेल बेटांवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा फारच भीषण पद्धतीने त्या माणसांची हत्या करण्यात आली. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की, सेंटीनेल जमातीच्या लोकांना बाहेरच्या लोकांशी संपर्क करण्यात रस नाही. सगळ्यात ताजी घटना म्हणजे 2018 साली ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी अमेरिकन मिशनरी जॉन चाऊ यांनी अनधिकृतपणे सेंटिनल बेटावर जाण्याचा प्रयत्न केला पण सेंटीनेल जमातीतील लोकांकडून त्यांची हत्या करण्यात आली.
संपर्क
जरी सेंटिनेलीज जमातीच्या लोकांनी माणसांशी संपर्क ठेवण्यात रस दाखवला नसला तरीदेखील माणसाने त्यांच्याशी संपर्क करणे थांबवलेले नाही, भारतीय कायद्यानुसार जरी त्यांच्याशी संपर्क करणे प्रतिबंधित असले तरी त्यांच्याबद्दल माहिती घेण्यास कोणी ना कोणी तरी तिथे जाण्याचा प्रयत्न करतंच. आत्तापर्यंत काही व्हिडिओ हाती लागले आहेत ज्यात काही वेळा सेंटिनेलीज लोकांनी थोडी कमी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.
मधुमाला चटोपाध्याय या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वरिष्ठ संशोधन अधिकारी आहेत. त्यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा सेंटिनेलीज लोकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. चटोपाध्याय जेव्हा अभ्यासासाठी ह्या जमातीला बोटीतून भेट द्यायला गेल्या तेव्हा हा भेट म्हणून त्यांनी भरपूर नारळ नेले होते. चटोपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या अंदमानच्या सहा वर्षांच्या अभ्यासादरम्यान या जमातीतील कोणीही त्यांच्याशी गैरवर्तन केले नाही, सामाजिक दृष्ट्या बघितले तर ही जमात आपल्यापेक्षा खूप पुढारलेली आहे.

भविष्य (सेंटिनेलीज जमात)
भविष्यात काय होईल हे सांगता येत नसले तरी विकासासाठी आवश्यक अभ्यास आपल्याला सेंटिनेलीज जमातीकडून नक्कीच करता येऊ शकतो आणि सेंटिनेलीज जमातीला माणसाने केलेल्या प्रगतीमध्ये सामावून घेतले जाऊ शकते. हजारो वर्षापासून स्वतःचे विलग जीवन जगणाऱ्या ह्या जमातीचा विकास करण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा का अनेक शतकं स्वतःच्या नियमानुसार जगत आलेली ही पद्धत आणि संस्कृती त्यांना त्यांच्या पद्धतीने राबवू द्यावी आणि त्यांना त्यांच्या नियमाप्रमाणे जगू द्यावे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये अवश्य मांडा.